जुना बुधवार संघाचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना बुधवार संघाचा विजय
जुना बुधवार संघाचा विजय

जुना बुधवार संघाचा विजय

sakal_logo
By

फोटो 05204
-
लोगो- अटल चषक फुटबॉल स्पर्धा
-
जुना बुधवार संघाचा विजय
पुढील फेरीत प्रवेश; सम्राटनगर फुटबॉल क्लबचे प्रयत्न अपुरे
 
कोल्हापूर, ता. २६ : तटाकडील तालिम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत जुना बुधवार तालीम मंडळ संघाने सम्राटनगर फुटबॉल क्लब संघावर ५ विरुद्ध २ गोल फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.  सामान्यांच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या सम्राटनगर संघाने जुना बुधवार संघावर दबाव बनवून ठेवला. सामन्याच्या २६ व्या मिनिटाला निरंजन कामते याने गोल नोंदवत सम्राटनगर ला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात आक्रमक खेळ करणाऱ्या सम्राटनगरच्या ऋषिकेश दाभोळे याने ४३ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना २-० असा केला. यानंतर जुना बुधवार संघाने अधिक आक्रमक खेळ करत सम्राटनगरवर दबाव आणला.  ४४ व्या मिनिटाला अभिषेक भोपळे याने गोल नोंदवला व सामना २-१ असा आणला.  या नंतर इम्यानुअल याने ४८ व ४९ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना ३ -२ असा केला. सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला रिचमंड आवेटी याने गोल नोंदवत सामन्यात ४-२ अशी आघाडी घेतली, तर सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला प्रकाश संकपाळ याने गोल नोंदवत सामना ५-२ असा केला. दरम्यान सम्राटनगरकडून गोलसाठी झालेले प्रयत्न अपुरे पडले. अखेरपर्यंत ५-२ अशी आघाडी कायम राहत जुना  बुधवार संघाने सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला.

चौकट
आजचा सामना 
सायंकाळी ४ श्री शिवाजी मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलिस 

चौकट
उत्‍कृष्ट असे
सामनावीर इम्यानुअल - जुना बुधवार तालीम मंडळ
लढवय्या निरंजन कामते - सम्राटनगर फुटबॉल क्लब