शिवाजी विद्यापीठ परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ परीक्षा
शिवाजी विद्यापीठ परीक्षा

शिवाजी विद्यापीठ परीक्षा

sakal_logo
By

दुसऱ्या दिवशीही
तीन गैरप्रकारांची नोंद

शिवाजी विद्यापीठ उन्हाळी सत्रातील परीक्षा

कोल्हापूर, ता. २६ ः शिवाजी विद्यापीठाच्या मार्च -एप्रिल उन्हाळी सत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांतर्गत आज १२ विभागांच्या लेखी परीक्षा सुरू झाल्या. या परीक्षांसाठी ३२,२७५ विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तीन गैरप्रकारांची नोंद झाली.
कालपासून परीक्षांना सुरूवात झाली आहे. या सत्रात सहाशे अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थी प्रविष्ट आहेत. जुलैपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. दरम्यान, आज सुरू झालेल्या परीक्षांमध्ये कॉमर्स, आर्ट, कॉम्प्युटर ॲप्लीकेशन, बीबीए, बॅचलर ऑफ डिझाइन, शिक्षणशास्त्र, फॅशन डिझायनिंग, बँक मॅनेजमेंट, समाजकार्य शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, डिफेन्स या विभागातील परीक्षांचा समावेश आहे.
परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकांकडून आज जिल्ह्यातून तीन गैरप्रकाराची प्रत्यक्ष नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आली. सातारा व सांगली जिल्ह्यातून कोणत्याही गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आलेली नाही. तसेच परीक्षेचे गांभीर्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.