बदली झालेले ‘ते’ सात अधिकारी तुर्त मनपाकडेच कार्यरत राहणार

बदली झालेले ‘ते’ सात अधिकारी तुर्त मनपाकडेच कार्यरत राहणार

बदली झालेले ‘ते’ सात अधिकारी
तुर्त मनपाकडेच कार्यरत राहणार

इचलकरंजी, ता. २६ ः येथील मनपाकडील महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या संवर्गातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्य नगरपालिकांत झाल्या होत्या. त्यांना कार्यमुक्त केल्यास महापालिकेचे बहुतांशी कामकाज ठप्प होणार होते. त्यामुळे महापालिकेसाठी मंजूर आकृती बंधानुसार पदभरतीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत बदली आदेश रद्द करावा अथवा पर्यायी अधिकाऱ्यांची उपलब्धता करावी, अशा मागणीचा प्रस्ताव आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नगरपरिषद संचालक तथा आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे पर्यायी अधिकारी उपलब्ध होईपर्यंत बदली झालेले कर्मचारी इचलकरंजी मनपाकडेच कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे बदलीमुळे महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची भीती तुर्तास तरी दूर झाली असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी कामकाज पूर्ववत सुरु ठेवण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
इचलकरंजी मनपाकडे कार्यरत असणारे स्थापत्य अभियंता संजय बागडे यांच्यासह बांधकाम विभागाकडील अभियंता राजेंद्र गवळी, प्रविण बैले, राधिका हावळ यांची बदली राज्यातील विविध नगरपालिकांत झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे मनपाच्या बांधकाम विभागाचे कामकाज पूर्णतः ठप्प होणार होते. संगणक अभियंता संतोष पवार, लेखापाल नितीन सरगर, दिलीप हराळे या अधिकारी तथा कर्मचा-यांचीही बदली झाली आहे. त्यांची बदली झाली असली तरी महापालिका झाल्यामुळे त्यांच्या जागी नविन नियुक्ती झालेली नाही. दुसरीकडे शासनाने मनपासाठी कर्मचाऱ्यांसाठी आकृती बंद मंजूर केला आहे. त्यानुसार नविन पदभरती झालेली नाही. परिणामी, या बदली प्रक्रियेमुळे प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे.
तथापि, आयुक्त देशमुख यांनी नगर विकास विभागासह नगरपरिषद प्रशासन संचलनालयाचे आयुक्त तथा संचालकांना एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये मंजुर आकृतीबंधानुसार पदभरतीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची बदली आदेश तुर्त रद्द करावा अथवा त्यांच्याऐवजी पर्यायी अधिकारी बदलीने पदस्थापना करण्याची मागणी केली आहे. त्याची कार्यवाही होईपर्यंत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुर्तास तरी बदली झालेले कर्मचारी महापालिकेकडेच कार्यरत राहणार आहेत. परिणामी, महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची भिती तुर्तास दूर झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com