बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बातमी
बातमी

बातमी

sakal_logo
By

स्वत:च्या क्षमतेची जाणीव महत्त्वाची आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘कोणतेही सामाजिक काम कसे करायचे, हे समजून घ्यायचे असेल तर पहिल्यांदा अभ्यास करायला शिका. ज्ञान, कौशल्ये, तत्त्वज्ञान, कायद्याच्या अभ्यासाची चौकट तुमच्याकडे असावी. स्वत:मध्ये पहिल्यांदा बदल करायला शिका. दुसरा जे काही सांगतो आहे, ते ऐकून घेण्याची क्षमता स्वीकारा. सामाजिक काम करताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, तरच सामाजिक काम घडू शकेल.’’ त्या म्हणाल्या, ‘‘कोणतीही अंधश्रद्धा पाळू नका. ताणतणावाला सामोरे जाऊ नका. घरातील अन्य ज्येष्ठांचा, आई-वडिलांशी संवाद साधा. त्यांचा प्रथम आदर करा. आपल्याकडे घराकडे, स्वत:कडे लक्ष द्या; मगच सामाजिक कामाला झोकून द्या.’’ सामान्य ज्ञानाचा अभ्यास करा, स्वत:मध्ये आत्मविश्‍वास निर्माण करा, असा सल्ला देत त्यांनी सांगितले, की ज्या गोष्टी मुळातच पटत नाहीत, त्या नाही म्हणायला शिका. जे क्षेत्र तुम्हाला निवडायचे आहे, त्यासाठी स्वत:च्या क्षमतेची जाणीव असणे गरजेचे आहे. खरेतर, कोणतेही सामाजिक प्रश्‍न हे आपणच निर्माण करीत असतो. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. दिवसातून काही वेळासाठीच सोशल मीडियाचा वापर करा; मात्र सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका. मानवी मूल्ये जपा.