विद्यापीठ संघाला नेमबाजीत सुवर्ण

विद्यापीठ संघाला नेमबाजीत सुवर्ण

05314
प्रतीक जोग
05315
आदित्य साळुंखे


विद्यापीठ संघाला नेमबाजीत सुवर्ण
कोल्हापूर, ता. २७ : डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठ संघाने १० मीटर पिप साईट प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. यामध्ये प्रतीक जोग (६२८.८), सुमेध सासणे (६२८.१) व आदित्य साळुंखे (६२६.८) यांनी एकत्रित १८८१.६ गुण कमावत सुवर्णपदक पटकाविले. पंजाब युनिव्हर्सिटी १८७२ गुणांसह द्वितीय क्रमांकावर व चौधरी चरण सिंह युनिव्हर्सिटी मेरठ १८७०.३ गुणांसह तृतीय क्रमांकवर राहिली. प्रतीकला प्रशिक्षक विनय पाटील यांचे, आदित्य याला राधिका हवालदार यांचे मार्गदर्शन लाभले. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विजय रोकडे यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com