महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॉईज फुटबॉल स्पर्धा

महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॉईज फुटबॉल स्पर्धा

लोगो - महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॉईज फुटबॉल स्पर्धा  


कोल्हापूर जिल्हा संघ उपांत्य फेरीत 
कोल्हापूर, ता. २७ : धुळे येथील शिरपूरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा संघाने औरंगाबाद संघावर ३ - ० गोल फरकाने विजय मिळवला. यामध्ये कोल्हापूर संघाच्या स्वरूप बागडीकरणे २५ व्या मिनिटाला ईशान तिवलेने दिलेल्या पासवर गोल नोंदवून संघास १-० गोलने आघाडीवर ठेवले. यानंतर हर्षवर्धन पाटीलने ३४ व्या मिनिटाला आदित्य पाटील याने दिलेल्या पासवर गोल नोंदविला, तर उत्तरार्धात ईशान तिवले याने आदित्य पाटीलने दिलेल्या पासवर ५४ व्या मिनिटाला गोल करून संघास ३-० गोल फरकाने आघाडीवर ठेवले. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. आघाडी फळीत गंधर्व के, ईशान तिवले व स्वरूप बागडीकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मध्यम फळीत आदित्य पाटील, हर्षवर्धन पाटील व श्रेयस निकम यांनी आघाडी फळीसाठी उत्तम पास दिले. बचाव फळीमध्ये रोहित जांभळे, आयुष्य शिंदे, शुभम कांबळे व प्रतीक पाटील यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या चढाया रोखून ठेवल्या. संघाचे मार्गदर्शक संतोष पवार व व्यवस्थापक म्हणून अमित शिंत्रे यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com