
इचल ः राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धा
05403
इचलकरंजी : राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील उपांत्य सामने शनिवारी चुरशीने झाले. स्पर्धेतील एक क्षण.
कोल्हापूर पोलिस, पाटील ट्रस्ट अंतिम फेरीत
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा; आज विजेतेपदासाठी होणार लढत
इचलकरंजी, ता. २७ : येथील देशभक्त बाबासाहेब खंजीरे क्रीडांगणावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेत कोल्हापूर पोलिस व एसडी पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) या संघांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या (रविवार) या दोन्ही संघात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
पहिला उपांत्य सामना कोल्हापूर पोलिस आणि महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर) यांच्यात झाला. अत्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने महाराष्ट्र क्रीडा मंडळ संघावर ४-१ अशा गोलफरकाने विजय प्राप्त केला. किरण मोहिते यांची सामनावीर म्हणून निवड झाली. नाणेफेक महापालिकाआयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते झाली. या वेळी विद्युत विभागाचे अभियंता संदीप जाधव, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. सुनिलदत्त संगेवार, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, जन्मशताब्दी महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष राहुल खंजीरे उपस्थित होते.
दुसरा उपांत्य सामना एसडी पाटील (इस्लामपूर) आणि हनुमान ब्लेसिंग (कोल्हापूर) यांच्यात झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात एसडी पाटील संघाने हनुमान ब्लेसिंग संघाचा ६-० असा परावभ केला. ओंकार डांगरे सामनावीर ठरला. तर दिवसातील उत्कृष्ट खेळाडू दिनेश पाटील यांची निवड झाली. या सामन्याची नाणेफेक चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धोंडीराम कस्तुरे यांचे हस्ते झाली. यावेळी उद्योगपती अभिजित मांगलेकर, संदीप टेके, दिनेश सोनटक्के उपस्थित होते.
दरम्यान, अंतिम सामान्यापूर्वी उद्या (ता. २८) महिलांचा प्रदर्शनीय सामना दुपारी ३ वाजता होणार आहे. यामध्ये कोल्हापूर सिनिअर व कोल्हापूर ज्युनिअर हे महिलांचे संघ भाग घेणार आहेत. अंतिम सामना दुपारी ४ वाजता चालू होणार आहे. स्पर्धेचा बक्षिस समारंभ माजी खासदार निवेदिता माने व आमदार राजू आवळे यांच्या हस्ते होणार आहे.