
जंगम समाज संस्कार शिबीर
05420
कोल्हापूर : जंगम समाजातर्फे मुलांसाठी संस्कार शिबीर घेण्यात आले.
जंगम समाजातर्फे संस्कार शिबीर
कोल्हापूर, ता. २७ : वीर माहश्वर गुरूकुल संस्कार सेवा मंडळ व कोल्हापूर जिल्हा जंगम समाजातर्फे कोल्हापूर हायस्कूलमध्ये संस्कार शिबीर घेण्यात आले. हे शिबीर शुक्रवार (ता. २) पर्यंत सुरू राहणार असून आज या शिबीरात अय्पाचार व दिक्षा विधी सोहळा झाला. या वेळी श्री शिवलिंग शिवाचार्य बेळंकीकर, शिवाचार्य वाळवेकर स्वामी उपस्थित होते. वेद, मंत्रपठण, वेदोक्त ज्ञानाचे धडे शिबीरात घेतले जाणार आहेत. या शिबीराचे हे तेरावे वर्ष असून दरवर्षी शंभर ते दीडशे मुले सहभागी होतात. यावेळी जंगम समाजाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जंगम, कार्याध्यक्ष अशोक स्वामी, महिला अध्यक्ष स्नेहल मठपती, सचिव विवेकानंद हिरेमठ, सुनील जंगम, पवन हिरेमठ, सुशांत हिरेमठ, भूषण स्वामी, कल्लाप्पा स्वामी, महेश्वर जंगम, श्रीहरी स्वामी, गणेश स्वामी, महांतेश स्वामी उपस्थित होते. शिबीरात ५० जंगमबटूंनी दिक्षा घेतली.