
लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट
05419
...
रस्ते खड्डेमुक्त करा, नंतर हेल्मेटची
सक्ती कराः लॉरी ऑपरेटर असोसिएशन
कोल्हापूरः रस्ते खड्डेमुक्त करा, नंतर हेल्मेटची सक्ती करा. अन्यथा हेल्मेटसक्तीला विरोध करीत असल्याचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रथम कोल्हापूर शहराला खड्डेमुक्त करा. अतिक्रमणयुक्त रस्ते आहेत. अपघाताला कारणीभूत असणारी कारणे शोधून हे रस्ते संबंधित विभागाकडून दुरुस्त करावेत. रस्ते वाहतुकीस सुलभ आणि खड्डेमुक्त करावेत, गतिरोधक कायदेशीर मान्यतेनुसार करावेत. पार्किंगच्या सुविधा उपलब्ध कराव्यात. वाहतुकीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत आणि नंतर हेल्मेटची सक्ती करावी. अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये लॉरी असोसिएशन तर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.’ आपल्या मागण्या शासनास कळवू ,असे काटकर यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, संचालक शिवाजी चौगुले, विलास पाटील, पंडित कोरगावकर, गोविंद पाटील, सतीश धनाल, अजित माने, उमेश महाडिक, प्रकाश भोसले, जयराम जाधव, रवी चौगुले, अब्दुल समद कडगिरी, वाळू वाहतूक संघटनेचे विजय पाटील, राकेश फराकटे, ऋग्वेद पाटील आदी उपस्थित होते.