झूम प्रकल्प पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झूम प्रकल्प पाहणी
झूम प्रकल्प पाहणी

झूम प्रकल्प पाहणी

sakal_logo
By

05421
कसबा बावडा ः येथील झूम प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करताना आमदार सतेज पाटील.

झूम प्रकल्पावरील आगीचा
प्रश्‍न तातडीने निकालात काढा
आमदार सतेज पाटील; मंगळवारी प्रशासकांसोबत बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः झूम कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेली आग तातडीने आटोक्यात आणावी. त्याशिवाय केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा. अन्यथा या ठिकाणी कचरा टाकायचा बंद न केल्यास स्वतः झूम येथे थांबून कचऱ्याची वाहने रोखणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. महापालिका अधिकाऱ्यांसोबत आज सायंकाळी त्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. सोमवारी (ता.२९) पुन्हा झूम प्रकल्पाची पाहणी करून मंगळवारी (ता.३०) महापालिका प्रशासकांसोबत आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ, आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कचऱ्याला लागलेली आग ताबडतोब आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा स्प्रिंकलर टँकर लावावा. जादा मनुष्यबळ ठेवा, सफाईसाठी महानगरपालिकेने पाच ते सहा कर्मचारी या ठिकाणी कायमस्वरूपी नेमावेत, झूम प्रकल्पाच्या बाजूने झाडे लावून या ठिकाणी लॉन करा शिवाय बाहेरच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून वॉचमनची नेमणूक करा आदी सूचना आमदार पाटील यांनी केल्या. या वेळी मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक संदीप नेजदार, माजी नगरसेवक राजेश लाटकर, सागर येवलुजे, संजय लाड आदी उपस्थित होते.