Tue, October 3, 2023

शिबिरात ४५ जणांचे रक्तदान
शिबिरात ४५ जणांचे रक्तदान
Published on : 28 May 2023, 11:31 am
शिबिरात ४५ जणांचे रक्तदान
इचलकरंजी : रयत सोशल फौंडेशन व वैभवी लक्ष्मी ब्लड सेंटरतर्फे येथील आसरानगर परिसरातील शिक्षक कॉलनी, श्री सिद्धिविनायक मंदिर येथे रक्तदान शिबिर झाले. यात ४५ जणांनी रक्तदान केले. रयत सोशल फौंडेशनचे संस्थापक अभिषेक पाटील यांनी रक्तदान ही काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. अर्जुन बागडे, राजेंद्र गवळी, लक्ष्मण पारसे, संदीप लोंढे, विनायक कोरे, सूरज माने आदी उपस्थित होते.