चायनीज अन्‌ देशी काकडी वगैरे...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चायनीज अन्‌ देशी काकडी वगैरे...!
चायनीज अन्‌ देशी काकडी वगैरे...!

चायनीज अन्‌ देशी काकडी वगैरे...!

sakal_logo
By

05512/ 05514
कोल्हापूर : चायनीज काकडी अन्‌ काटे काकडीचे असे ढीग लक्ष्मीपुरी मंडईत दिसत आहेत; तर दुसरीकडे लिंबूची आवक वाढल्याने लिंबू स्वस्त झाले आहेत.

सॅलडसाठी चायनीज काकडी मंडईत
आल्लेही महागले : आवक वाढल्याने लिंबू झाले स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : सॅलड करण्यासाठी काटे काकडी अन्‌ चायनीज काकडी मंडईत आली आहे. चायनीज काकडीला अधिक मागणी असून, काकडीबरोबर मुळा, बेळगावी गाजर, लाल बीट एकत्र करून सॅलड करता येते. काटे काकडीची आवक ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. उन्हामुळे काटेकाकडीचा हिरवा रंग बाजूला झाला असून, ही काकडी काहीशी पांढरट स्वरूपात दिसू लागली आहे, असे काकडी विक्रेत्यांनी सांगितले. तसेच आल्ल्याची आवक कमी झाली असून, गेली दोन आठवडे आल्ल्याचा दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेला आहे. अन्य फळभाज्यांमध्ये पाच ते दहा रुपये प्रतिकिलो वाढ झाली. मेथी, कोथिंबीरीबरोबर अन्य भाज्यांमध्ये पाच रुपयांची वाढ झाली. उन्हाळा तीव्र असल्याने पालेभाज्यांचे प्रमाण या काळात कमी होते. पाऊस सुरू झाला की, पालेभाजीची आवक वाढू लागते.
रानमेव्याचीही आवक सुरू असून, आजरा भागातील बरक्या फणसाची विक्री सुरू आहे.
...
चौकट
फळभाजीचे दर (प्रतिकिलो रुपये)
चायनीज काकडी *३०० रुपये दहा किलो
काटे काकडी *२५० रुपये दहा किलो
आल्लं *२००/१८०
शेवगा शेंग *१० रुपये पेंडी
वरणा *८०
हिरवी मिरची *५०
ढब्बू मिरची *५०
बिनिस *१२०
दोडका *५०/६०
हिरवी वांगी *५०
काळी वांगी *५०
कारली *४०
तोंदली *५०
दूधी भोपळा *२० रुपये नग
भेंडी *४०
फ्लॉवर गड्डा *४०
कोबी *२० रुपये किलो
लिंबू *दहा रुपयाला दहा नग
हेळवी कांदा *१५/२०
बटाटा *२५
काटेभेंडी *८०
पडवळ *१० ते २० रुपयाला नग
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *१०/२०
रताळे *४०
जवारी गवारी *२० रुपये पावशेर
लाल बीट *१० रुपये एक नग
कच्ची केळी *४०/५० रुपये डझन
लाल भोपळा *४०
मक्का कणीस *१० रुपयाला एक नग
कर्नाटकी भाजीचा कोहळा *८०/१०० रुपये नग
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
घोसावळे *४०
...
चौकट
पालेभाज्यांचे दर (प्रतिपेंढी)
मेथी *२०/२५
घोळीची भाजी *१०
लाल माट *१०
तांदळी *१०
शेपू *२०
कोथिंबीर *२०/२५
आंबाडा *१०
आंबट चुका *१०
पालक *१०
करडई *१०
...
चौकट
सोने-चांदीचे दर (रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत घेतलेले दर)
सोने-------६१, ६९५ प्रतितोळा
चांदी------७३, ००० प्रतिकिलो