Sun, October 1, 2023

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या
Published on : 28 May 2023, 1:07 am
सेवानिवृत्त पोलिसांचा अमृत महोत्सवी सत्कार
कोल्हापूर ः छत्रपती शाहू निवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिशनतर्फे ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व्रतस्थ निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचा ‘अमृत महोत्सवी सत्कार समारंभ’ आयोजित केला आहे. मंगळवारी (ता. ३०) पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये हा सोहळा होईल. या कार्यक्रमास राज्य मानव अधिकार कमिशनचे सदस्य भगवंतराव मोरे, निवृत्त अप्पर पोलिस महासंचालक खंडरोव शिंदे, विशेष पोलिस महानिरीक्षक रामराव पवार उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात सध्या १२० निवृत्त पोलिस कर्मचारी आहेत, अशी माहिती संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब गवाणी पाटील यांनी दिली.