पत्रके काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके काही
पत्रके काही

पत्रके काही

sakal_logo
By

होनाई येथे आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात
कोल्हापूर : व्ही. एम. एस. रिसर्च फाउंडेशनतर्फे समाजाकरिता विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला अनुसरून विज्ञान तंत्रज्ञान, शेती व मानवी मूल्ये यांच्यातील बदलावर व्हिएतनाम देशातील होनाई येथे सहावी आंतरराष्ट्रीय परिषद झाली. परिषदेकरिता गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज यांनी सहयोगी म्हणून काम पाहिले. यू.सी.एस.आय. युनिर्व्हसिटी मलेशियातील डॉ. विजय वधायी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन झाले. डॉ. इनाग्रा पून, डॉ. मोरे, डॉ. निमगारे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मंजिरी मोरे प्रमुख उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल डॉ. मंजिरी मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. परिषदेत विविध शास्त्रज्ञांची संबंधित विषयावर व्याख्याने झाली. विज्ञान तंत्रज्ञानाचा मानवी जीवनासाठी उपयोग यावर चर्चा होऊन वैश्विकतेच्या दृष्‍टिकोनातून विधायक निर्णय घेतले. परिषदेला भारत, मलेशिया, थायलंड तसेच जगभरातून विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञ उपस्थित होते. प्रा. जयकुमार देसाई, दौलत देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांचे प्रोत्साहन लाभले.
...
फक्त फोटो : 05543
कोल्हापूर : मोहन भांदिगरे यांच्या ‘थोडा उशीर झाला’ या कविता संग्रहाचे प्रकाशन साहित्यिक बाबूराव शिरसाट यांच्या हस्ते झाले. सदाशिव गवस, प्रभाकर धुरी, अनुराधा भांदिगरे, मानसी गोखले, आनंदा जाधव, संतोष वायंगणकर, विजय देवदास, जयंत साटम, चारुता काळे, सूनेत्रा कोळंबकर, संजय जोशी, राजदा कुबल तसेच शा. कृ. पंत वालावलकर अद्यापक महाविद्यालयातील देवगडचे १९८८-८९ चे विद्यार्थी उपस्थित होते.
...
फक्त फोटो : 05547
कोल्हापूर : मृत बांधकाम कामगार सूरज गायकवाड यांच्या वारसांना पाच लाख रुपयांच्या अनुदानाचा धनादेश केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला. गायकवाड हे रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडीचे सभासद आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य होते. प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटीळे, प्रदीप कांबळे, अनिल मोरे, विजय कांबळे, दत्ता लोहार यांच्यासह गायकवाड कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.