
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या लेकींचे यश
05586
कोमल माने, भक्ती लुगडे
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या लेकींचे यश
गडहिंग्लज : येथील वृत्तपत्र विक्रेते नामदेव लुगडे यांची कन्या भक्ती आणि विक्रेते भीमराव माने यांची कन्या कोमल यांनी बारावी परीक्षेत चांगले यश मिळविले. कोमल माने ही शिवराज कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकत होती. तीने बारावीमध्ये ७८.३३ टक्के गुण घेवून यश मिळविले. तसेच मराठी व अकौटंन्सी विषयात तीने शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. भक्ती लुगडे गडहिंग्लज ज्युनिअर कॉलेजमधून बारावी परीक्षा दिली. तिने ५३ टक्के गुण मिळवून यश पटकावले. लुगडे हे हनिमनाळ तर माने गडहिंग्लजचे रहिवाशी आहेत. नामदेव लुगडे व भीमराव माने दोघेही पडेल ते काम करुन गडहिंग्लज शहरात वृत्तपत्र विक्रेता म्हणून ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता कष्ट घेतात. लुगडे विमा कंपनीतही काम करतात. हे दोघेही कष्टाने आपल्या पाल्यांना शिक्षण देत प्रोत्साहीत केले आहे. दोघांच्याही लेकींनी मिळविलेल्या यशामुळे कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे.