
हिंदू महासभा सत्कार
05785
कोल्हापूर : अखिल भारतीय हिंदू महासभा व अखिल भारतीय भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी संघटनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त
कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव
हिंदू महासभा, भ्रष्टाचारविरोधी संघटनेतर्फे आयोजन
कोल्हापूर, ता. २८ : अखिल भारतीय हिंदू महासभा व अखिल भारतीय भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी संघटनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. राजर्षी शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी आनंद काडसिद्धेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते कर्तृत्वान व्यक्तींना गौरविण्यात आले.
या वेळी सतीश देसाई यांना आदर्श शिक्षण महर्षी पुरस्कार, शोभा पाटील व सागर भोगम यांना आदर्श सरपंच पुरस्कार, यश देसाई यांना आदर्श उद्योगरत्न पुरस्कार, विजय गुरव यांना आदर्श ज्योतिष भूषण पुरस्कार, महापालिकेचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांना आदर्श कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार, जयराज राणे यांना हिंदू भूषण पुरस्कार, रामचंद्र परळीकर यांना आदर्श यशस्वी उद्योजक कॅटरर्स पुरस्कार, विलास जाधव यांना आदर्श ज्योतिषाचार्य पुरस्कार, पांडुरंग पाटील यांना आदर्श भूषण पुरस्कार, शोभा शेलार - पाटील यांना आदर्श ज्योतिषरत्न पुरस्कार, एकनाथ पाटील यांना आदर्श सहकार रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सुनील सामंत यांनी सूत्रसंचालन केले.