कै.आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ व ब विजयी

कै.आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस ॲकॅडमी अ व ब विजयी

आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् विजयी
कोल्हापूर, ता. २८ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित माजी आमदार स्व. दिनकरराव यादव चषक अ गट क्रिकेट स्पर्धेतील आजचा सामना कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् ॲकॅडमी अ विरूध्द फायटर्स स्पोर्टस् क्लब यांचे मध्ये झाला. सामन्यात सहारा स्पोर्टस् अ ने ५ विकेटनी विजय मिळविला. प्रथम फलदांजी करताना फायटर्सने २८.१ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या. यामध्ये अनुराग मिस्त्री २६ व आदित्य शिंदे ११ धावा केल्या. सहारा स्पोर्टस् कडून अल्केश कवाळे ५, रवि चौधरी ३, रोहीत गिरीने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सहारा स्पोर्टस् संघाने १४.२ षटकांत ५ बाद १०६ धावा केल्या.  यामध्ये रोहीत गिरी  ४६, रवि चौधरी १९ व यशराज कोरोचे नाबाद १७  धावा केल्या.  फायटर्स कडुन तन्वीर सय्यद २, सोहम घाळी व साद्दिक पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. 
दुसरा सामना इचलकंरजी येथे कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् ॲकॅडमी ब विरूध्द पॅकर्स क्रिकेट क्लब यांच्यात झाला. सामन्यात कै आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् ॲकॅडमी बने ९९ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना सहारा स्पोर्टस् बने ४० षटकांत ७ बाद २१६ धावा केल्या. यामध्ये अभिनंदन गायकवाड ४८, संयम छपरे ४१, प्रथम सवनुर ३२ धावा केल्या. पॅकर्सकडून आदित्य पिसाळ २, सुधीर तोडकर, मधुसुदन राव, धैर्यशील शिंदे, व वैभव पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पॅकर्स क्लबने २५.२ षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या. यामध्ये शुभम वाडकर ५३ व वैभव पाटील २१ धावा केल्या सहारा ब कडुन प्रथमेश साठेने ५,  व साईप्रसाद मानेने २, अभिषेक आंब्रे व आदित्य पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com