भाजप कार्यालय उद्घाटन बातमी

भाजप कार्यालय उद्घाटन बातमी

(फोटो - ०५६३७, ०५६३८)
....

भाजप कार्यालय लोकसेवेचे केंद्र बनेल

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वासः जिल्हा भाजपच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण

कोल्हापूर, ता. २८ ः ‘राजकीय पक्षाचे कार्यालय हे जरी त्यांच्या कामाच्या सुलभतेसाठी असले तरी ते जनसेवेचे स्थान असते. इथे लोक आपल्या समस्या घेऊन येतात. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे निराकरण करायचे असते. भारतीय जनता पक्षाचे नुतन कार्यालय हे लोकसेवेचे केंद्र बनेल,’ असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. नागाळा पार्क येथे उभारलेल्या भाजपच्या नवीन कार्यालयाचे आज लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पक्षाचे नवे कार्यालय नागाळा पार्क येथे बांधण्यात आले आहे. कार्यालयाच्या आवारातील गणपती मंदिराचे भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. गेल्या आठवड्यात कार्यालयात धार्मिक विधी कऱण्यात आले. आज याचे लोकार्पण झाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालय असावे अशी कल्पना मांडली. जागा घेऊन कार्यालय उभारणी करण्यात कोल्हापूर भाजपचा पहिला क्रमांक आहे. पक्षाचे कार्यालय हे जरी कामाच्या सुलभतेसाठी असले तर ते खऱ्या अर्थाने जनसेवेचे केंद्र असते. इथे आल्यावर आपले कोणी तरी ऐकणार आहे. आपल्याला मदत मिळणार आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली पाहीजे. त्या दृष्टीने भाजपचे कार्यालय हे लोकसेवेचे केंद्र बनेल.’
याप्रसंगी अनंत खासबारदार, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, शंतनू मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे, सरचिटणीस नाथाजी पाटील, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, हेमंत अराध्ये, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, अजित ठाणेकर, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण नकाते, सुहास लटोरे, माणिक पाटील चुयेकर, सुजीत चव्हाण, अजिंक्य चव्हाण, जयराज निंबाळकर, हर्षद कुंभोजकर, अमोल पालोजी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com