वाचकांची पत्रे

वाचकांची पत्रे

मत-मतांतरे
---------

भ्रष्ट यंत्रणेला आवर घालावा
भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडल्याच्या बातम्या अगदी दररोज आपल्याला वाचावयास मिळतात. तरीही त्याचे कोणालाही काहीही देणे-घेणे नाही. दररोज सर्रास असे प्रकार घडताना दिसतात. अपराध करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याबाबत काही लवलेषही दिसत नाही. भ्रष्ट यंत्रणेकडून सामान्य जनतेची लुबाडणूक, पिळवणूक सुरूच असते आणि त्यांना मिळालेले पैसे घेऊन आपल्याच माणसांना लुबाडत असतात. ही भ्रष्ट यंत्रणा सुधारायला हवी, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
प्रशांत शहापुरे, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर)

सुट्या पैशांसाठी एक उपाय
बिले भरण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांत जावे लागते. अनेकदा बिल भरण्यासाठी ज्येष्ठ व्यक्ती किंवा गृहिणी असतात. अशा वेळी बिल भरल्यावर काउंटरवर काम करणाऱ्याकडे सुटे पैसे किंवा सुट्या नोटा द्यावयास नसतात. त्यामुळे पैसे येईपर्यंत बिल भरणाऱ्यास थांबावे लागते. त्यातून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्‌भवतात. यावर मार्ग काढताना ‘केएमटी’च्या उत्पन्नातून जे पैसे जमा होतात, ते बहुतेकदा सुट्या स्वरूपातच असतात. त्यातील काही रक्कम जर अशा कार्यालयांत दिली तर सुट्या पैशांचा प्रश्‍न निकालात निघू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ वा गृहिणींचा वेळ वाचू शकतो.
सदानंद चं. ठाकूर, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com