ब्रेक निकामी खासगी बसने सात वाहनांना चिरडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेक निकामी खासगी बसने सात वाहनांना चिरडले
ब्रेक निकामी खासगी बसने सात वाहनांना चिरडले

ब्रेक निकामी खासगी बसने सात वाहनांना चिरडले

sakal_logo
By

05596, ५५६२
भरधाव बसची
सात वाहनांना धडक
इचलकरंजीच्या दोघांसह चौघे जखमी

रत्नागिरी, ता. २८ : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे आज सकाळी तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्यामुळे नियंत्रण सुटलेल्या खासगी आराम बसने समोरून येणाऱ्या चार वाहनांसह दोन दुचाकींना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या चौघाजखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
जखमींत इचलकरंजीतील दोघेया विचित्र अपघातात बसने एकूण सात वाहनांना धडक दिली. यामध्ये बस चालक काशिफ खान, दुचाकीस्वार शग्गिर अजमिर अंसारी (कोकण नगर), मोटारीतील महेश घोरपडे (इचलकरंजी) आणि जितेंद्रकुमार चौगुले (इचलकरंजी) जखमी झाले आहेत. दरम्यान, ब्रेक निकामी झालेली बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या बँकेच्या जुन्या इमारतीवर जाऊन धडकली. अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साह्याने बस बाजूला घेण्यात आली आहे. अपघातात बसचालक जखमी झाला.
रविवारी सकाळी ११.४५ ला खासगी बस (एमपी ४५ पी १६२६) कोल्हापूरहून रत्नागिरीला चालली होती. हातखंबा येथे उतारावर गाडीचे ब्रेक निकामी झाली आणि चालकाचे नियंत्रण सुटले. चालक काशिफ खान (वय ४७, रा. उत्तर प्रदेश) यांच्या हे लक्षात आले. त्यांनी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही वेग कमी न झाल्यामुळे बसने प्रथम मोटारीला (एमएच ४६ एपी ४२४३) जोरदार धडक दिली. ती मोटार थेट रस्त्यालगत असलेल्या रेलिंगवर जाऊन अडकली. तेथेच जवळ असलेल्या दुचाकी (एमएच ०८ एम ९०१०) बसच्या धडकेत चेंदामेंदा झाली. पुढे दुसऱ्या मोटारीला (एमएच २४ एएस ७४८२) बसने जबरदस्त धडक दिली. त्या मोटारीचा मागचा टायर निखळला. पुढे बसने हातखंबा गावात आणखी दोन दुचाकींना धडक दिली. त्या रस्त्याच्या बाजूला पडल्या. त्यानंतर बस रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या जुन्या बँकेच्या इमारतीच्या भिंतीवर आदळली. बसचा चालक आतच अडकला होता. त्याला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. इमारतीजवळील दोन दुचाकींचाही चक्काचूर झाला होता.