११

११

05635
कूर : येथे ओढ्यावरील पुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम.
...

कूर येथे ओढ्यावरील
पुलाचे काम संथगतीने

कोनवडे, ता. २६: पावसाळा तोंडावर आलेला असतानाही गारगोटी- कोल्हापूर मार्गावरील कूरनजीकच्या ओढ्यावरील काम गेली दोन महिने अत्यंत संथगतीने चालू आहे. या मुख्य मार्गावरील होणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक बांधकामाशेजारीच छोटे वळण करुन एकेरी सुरु आहे.
सध्या कूर ते पिंपळगाव रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यासाठी तब्बल ४५ कोटी ८६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कूरच्या नदीवरील पुलापासून पुढे रत्याचे जलदगतीने काम सुरु आहे. पण मुदाळतिट्टा- कूर दरम्यान असलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम गेली दोन महिने अत्यंत संथगतीने सुरु आहे. सखल भागात असलेल्या या नवीन पुलाची उंची रस्त्यापेक्षा चार-पाच फुटांनी वाढवली आहे. पुलावर स्लॅब पडून एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे व साहित्याचे ढीग तसेच पडले आहेत. वाहतुकीसाठी दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेले नाहीत. बांधकामा शेजारीच सखल भागातील छोट्या वळणावरुन जीवघेणी एकेरी वाहतूक सुरु आहे. तेथे एकावेळी दोन वाहने जात नसल्याने सतत छोटे अपघात घडत असतात.
पावसाळा तोंडावर आलेला असताना पुलाचे काम केंव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. तसेच पुलाची उंची वाढविल्याने दोन्ही बाजूंना भराव टाकूनच वाहतूक सुरु करावी लागणार आहे. अद्याप याबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. भराव टाकणार केंव्हा आणि रस्ता खुला होणार केंव्हा, याच्या प्रतिक्षेत प्रवासीवर्ग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com