
लायन्सच्या अध्यक्षपदी दिपाली पट्टणशेट्टी
लायन्सच्या अध्यक्षपदी दिपाली पट्टणशेट्टी
गडहिंग्लज, ता. २९ : येथील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी दिपाली पट्टणशेट्टी यांची निवड झाली. सविता वडगुले यांच्याकडे सचिवपदाची तर उज्ज्वला मार्तंड यांच्यावर खजिनदारपदाची जबाबदारी दिली आहे.
प्रथम उपाध्यक्षपदी विनायक गळतगे यांची निवड केली आहे. सर्वसाधारण सभेत या निवडी केल्या. २०२३-२४ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. पट्टीहिल या महिला लायनकडे सोपवली आहे. याच धर्तीवर गडहिंग्लज लायन्स क्लबच्या महिला लायन सभासदांची पदाधिकारीपदी निवड केली आहे. अशा पद्धतीने महिलांना प्रथमच संधी मिळाली आहे. विनायक गळतगे, प्रतिक पाटील यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. सौ. पट्टणशेट्टी यांचे भाषण झाले. माजी प्रांतपाल आण्णासाहेब गळतगे, राजेंद्र वडगुले, सुभाष पाटील, अशोक देशपांडे, प्रकाश शहा, सदानंद सुभेदार, राजशेखर दड्डी, गुरुराज हत्ती, आप्पासाहेब आरबोळे, सतीश सभासद, रामगोंडा पाटील, सुनील पट्टणशेट्टी, वैशाली बागी, उषा दड्डी, निता पाटील, सरला आरबोळे आदी उपस्थित होते.