
शासकीय अध्यापक महाविद्यालयात कौशल्य विकासाचे धडे
शासकीय अध्यापक महाविद्यालयात
कौशल्य विकास कार्यशाळा
कोल्हापूर ः येथील श्री महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयात २३ ते २५ मे दरम्यान कौशल्य विकास कार्यशाळा झाली. त्यामध्ये फलक लेखन, मराठी व इंग्रजी अक्षरलेखन, ब्रशच्या सहाय्याने अक्षर लेखन कौशल्य विकास, शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. सी. वाय. कांबळे अध्यक्षस्थानी होते. तज्ज्ञ मार्गदर्शक द्वारकानाथ भोसले यांनी छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. अजय साळी, सर्जेराव चव्हाण, गौतम माने उपस्थित होते. समन्वयक प्रा. लता पाटील यांनी आयोजन केले. या कार्यशाळेचा उपयोग छात्राध्यापकांना अध्ययन आणि अध्यापनात पाठ घेण्यासाठी, फलक लेखन, भित्तीपत्रके, विविध विषय आणि घटकाचे तक्ते तयार करण्यासाठी होणार आहे. कार्यशाळेत छात्राध्यापकांना अक्षरलेखनाचे धडे देऊन सराव करून घेण्यात आला. अंतिम चाचणी घेण्यात आली.