गड-विनयभंग

गड-विनयभंग

कर्जवसुलीसाठी महिलेशी अश्लिल भाषा

गडहिंग्लजमधील घटना : दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

गडहिंग्लज, ता. २९ : कर्ज वसुलीसाठी फोनवरुन अश्लिल भाषेत बोलून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान, फिर्यादीने महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत भडगाव मार्गावरील संबंधित खासगी बँकेत जाऊन व्यवस्थापकांना धारेवर धरले.
फिर्यादी महिलेच्या दिराने एका खासगी बँकेतून कर्ज घेतले आहे. या बँकेने कर्जवसुलीसाठी खासगी एजन्सी नेमली आहे. या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून फिर्यादी महिलेला फोनवरुन दिराने घेतलेले कर्ज तू भर म्हणून अश्लिल व अर्वाच्च भाषेचा वापर केला. अज्ञात व्यक्ती व महिलेने फिर्यादीला १३ ते २३ मे या कालावधीत वेगवेगळ्या नंबरवरुन फोन केले आहेत.
दरम्यान, आज सकाळी फिर्यादी महिला ही महिला मंडळांच्या कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांची भेट घेत घटनेची माहिती दिली. महिलांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर सर्वांनी आपला मोर्चा संबंधित बँकेकडे वळविला. त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापकांना धारेवर धरले. तक्रार अर्ज देऊनही संशयितांचे फोन कॉल्स येत असल्याबद्दल जाब विचारला. त्यानंतर बँक व्यवस्थापकांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com