
एसआयआयएलसी
लोगो एसआयआयएलसी
०००००००००००
शिका व्यावसायिक
इन्स्टंट पीठे, इन्स्टंट फूड
कोल्हापुरात सहाला प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण
कोल्हापूर, ता. २८ : सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. इन्स्टंट प्रकारामुळे अनेक पदार्थ अगदी कमी कालावधीत तयार करता येतात. असे व्यावसायिक स्वरूपातील इन्स्टंट फूड व इन्स्टंट पीठे प्रात्यक्षिकांसह शिकवणारे एकदिवसीय खास प्रशिक्षण ६ जून रोजी सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे कोल्हापूर सकाळ कार्यालयात होणार आहे.
चौकट
या पदार्थांचे होणार प्रात्यक्षिक
- इडली पीठ, डोसा पीठ, उडीद वडा
- गुलाब जामुन मिक्स, आईस्क्रीम मिक्स
- इन्स्टंट फालुदा, नाचणी डोसा नाचणी इडली
- पकोडा मिक्स, रबडी मिक्स, ढोकळा मिक्स,
- चटणी मिक्स, मंचुरी मिक्स, तंदूर मिक्स
चौकटीत दिलेल्या पिठांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिक त्याच्या व्यावसायिक पद्धती पॅकिंग, ब्रॅण्डिंग, लायसनिंग, फूड व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती प्राथमिक स्वरूपापासून मार्केटिंगपर्यंत आणि व्यावसायिक स्वरूप कसे द्यायचे, याबाबत सर्व मार्गदर्शन या विषयातील अनुभवी तज्ज्ञा सौ. गंधाली दिंडे या करणार आहेत.
चौकट
नोंदणीसाठी...
प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये
प्रशिक्षण ठिकाण : सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
नोंदणीसाठी संपर्क : ९१७५७२४३९९