शेतकरी संघ चौकशी

शेतकरी संघ चौकशी

05793
05791

सकाळ बातमी परिणाम

शेतकरी संघ कार्वे शाखेतील अपहाराची चौकशी
जिल्हा उपनिबंधकांचे आदेश; शासकीय लेखापरीक्षक नियुक्त

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : शेतकरी सहकारी संघाच्या कार्वे (ता. चंदगड) शाखेत पेट्रोल-डिझेल आणि खत विक्रीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी आज दिले. शेतकरी संघाने आदेश मिळाल्यानंतर तीन दिवसांत याबद्दलच अहवाल द्यावा लागणार आहे. तर, सनदी लेखापरीक्षक ए. के. उमराणीकर यांनी २०२२-२३ दरम्यान संघातील वैधानिक लेखापरीक्षण तत्काळ पूर्ण करून अहवाल येत्या १५ जूनपूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे द्यावा, अशा सूचना श्री. करे यांनी दिल्या आहेत. ‘सकाळ’मधून शनिवार (ता. २७) पासून शेतकरी संघाच्या कार्वे शाखेतील व्यवस्थापक आणि त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराचा पर्दाफाश करणारे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याची दखल घेत आज जिल्हा उपनिबंधक करे यांनी हे आदेश दिले आहेत.
शेतकरी संघाच्या कार्वे शाखेत व्यवस्थापकाने सुमारे ८० लाख रुपयांपर्यंतचा अपहार केल्याचे उघड झाले. यापैकी काही रक्कम वसूल केली आहे. तर, ६० लाख रुपयांपर्यंतचा घोटाळा अजूनही दिसत आहे. याचा ‘सकाळ’ने पर्दाफाश केला. त्यानंतर जिल्ह्यातील सहकारात एकच खळबळ उडाली. याचवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झालेल्या याच वृत्ताची दखल घेऊन शासकीय लेखापरीक्षकांकडून संघाचे २०२२-२३ दरम्यान वैधानिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. लेखापरीक्षण करत असताना ‘सकाळ’ मधून प्रसिद्ध मुद्द्यांवरच व्हावे, असेही नमूद केले आहे.

* ‘सकाळ’ वृत्ताच्या अनुषंगाने होणार तपासणी
जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने सर्व बाबींची सूक्ष्म तपासणी करावी. शेतकरी संघ अशासकीय मंडळ आणि शासकीय लेखापरीक्षकांनी त्यांना दिलेल्या मुदतीत प्रत्येक मुद्यावर सविस्तर अहवाल तयार करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिला पाहिजे. यामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, असेही आदेश दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com