पोलिस बदल्या...

पोलिस बदल्या...

05780
...

जिल्ह्यांतर्गत बदल्यांत शेजारील
पोलिस ठाणे मागणीकडे कल

मूळ तालुका वगळून बदली ः आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाली प्रक्रिया

कोल्हापूर, ता. २९ - आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलिसांचा मूळ तालुका वगळून त्यांच्या बदल्या आज इतर तालुक्यात करण्यात आल्या. विशेष करून सध्या असलेल्या पोलिसठाण्या शेजारील पोलिस ठाणे मागणीकडे अधिक कल राहिला. सुमारे ६०० पैकी ९० टक्के पोलिसांना अपेक्षेनुसार नियुक्ती देण्याचा प्रयत्न झाला आहे. सकाळी सात वाजता सुरू झालेली जिल्ह्यांतर्गत पोलिस बदल्यांची प्रक्रिया तब्बल १४ तासांहून अधिक वेळ सुरू राहिली. अलंकार हॉलमध्ये नुतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्यासमोर ही प्रक्रिया झाली.
एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिसांच्या आज पसंती क्रमांनुसार बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या १७, सहाय्यक फौजदार ४९, पोलिस हवालदार १८०, पोलिस नाईक १०५ तर पोलिस शिपाई १५४ यांच्या बदल्यांची प्रक्रिया सायंकाळपर्यंत पूर्ण झाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक (गृह) प्रिया पाटील, इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली.
अलंकार हॉलमध्ये व्यासपीठावर अधिकारी त्यांच्याकडील रिक्त जागांचा तपशील संगणकावर घेवून बसले होते. त्यांच्यासमोर पोलिसांनी उपस्थित राहून कोणते पोलिस ठाणे मागितले आहे आणि कोणते शिल्लक आहे याची माहिती दिली जात होती. त्याच ठिकाणी संबंधिताला कोणते पोलिस ठाणे मिळाले आहे, हे सांगितले जात होत. सर्व प्रक्रीया संगणकावर होत असल्यामुळे जागीच त्यांना सर्व आकडेवारी दिसून येत होती. बदलीसाठी आलेले सर्वच पोलिस गणवेशात होते. त्यामुळे अलंकार हॉल परिसरात मोठी गर्दी होती.
-----

गुन्हे अन्वेषणच्याही बदल्या होणार

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, विशेष शाखेसह पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रमुख विभागातील बदल्याही होणार आहेत. या महत्वाच्या ठिकाणच्या बदल्यांसाठी स्वतः पोलिस अधीक्षक मुलाखती घेणार आहेत. मात्र सध्या बदलीसाठी नाव असलेल्या सर्वांनाच पोलिस ठाण्यांत नियुक्त करण्यात आले. नंतर मुलाखती होऊन त्यांना महत्वाच्या शाखांमध्ये काम दिले जाणार असल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com