आशुतोष गोवारीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशुतोष गोवारीकर
आशुतोष गोवारीकर

आशुतोष गोवारीकर

sakal_logo
By

05792
....

आशुतोष गोवारीकर
चित्रनगरीत शुटींगसाठी सकारात्मक

आमदार ऋतूराज पाटील यांच्यासोबत केली पाहणी

कोल्हापूर, ता. २९ ः प्रसिध्द चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आज चित्रनगरीला भेट देवून येथील विविध लोकेशन्स, सुविधांची पाहणी केली. चित्रनगरीत शुटींगसाठी ते सकारात्मक असल्याचे आमदार ऋतूराज पाटील यांनी सांगितले. श्री. गोवारीकर खासगी कामानिमित्त शहरात आल्याची माहिती मिळताच त्यांना चित्रनगरीला भेट देण्याची विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी चित्रनगरीला भेट देवून पाहणी केली.
चित्रनगरीचे व्यवस्थापक दिलीप भांदिगरे यांनी चित्रनगरीतील वाडा, कोर्ट, हॉस्पीटल, पोलिस स्टेशनसह अन्य सेटची सविस्तर माहिती दिली. चित्रनगरीमध्ये उपलब्ध असलेली लोकेशन्स सुध्दा त्यांनी दाखवली. मालिकांच्या शुटींगबरोबरच चित्रपटांचे शुटींग होणे आवश्यक आहे. त्यामुळे चित्रनगरीची फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगली प्रतिमा तयार होईल, असे श्री. गोवारीकर यांनी सांगितले.
चित्रनगरीच्या विकासासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नशील आहोत. मालिकांबरोबरच चित्रपटांचे शुटींग सुरु झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे अशा प्रकारची शुटींग होण्याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे आमदार ऋतूराज पाटील यांनी सांगितले. यावेळी अष्टविनायक मिडियाचे संग्राम पाटील, डॉ. महादेव नरके, मोरेवाडीचे सरपंच ए.व्ही. कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमर मोरे, सिद्धी कारंडे, सुदर्शन पाटील, ऋषिकेश व्हुन्नुरे, उजळाईवाडीचे नंदकुमार मजगे आदी उपस्थित होते.
..........

अंबाबाई- जोतिबा दर्शन

श्री. गोवारीकर एका खासगी कामानिमित्त आई- वडिलांसह शहरात होते. सकाळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेतले आणि चित्रनगरीची पाहणी झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईला परतले.