भू-विकास बँक

भू-विकास बँक

सातबारावरील बोजा कमी करुन घ्या
ीू
भूविकास बँक अवसायक : कर्मचाऱ्यांनाही आवाहन

कोल्हापूर, ता. ३० : भू-विकास बँकेच्या कर्जदारांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कर्जदारांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तलाठ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहु. विकास बँकेचे अवसायक जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
अवसायकांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भू-विकास बँकेच्या कर्जदार शेतकरी सभासद यांची कर्जाची रक्कम संपूर्णपणे माफ केली आहे. शासनाने ९ नोव्हेंबर २०२२ ला हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कर्जमाफी झालेल्या सभासदांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाच्या बोजाची नोंद कमी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांनी गाव कामगार तलाठी यांच्याकडून बोजा कमी करुन घेण्याचे आवाहनही केले आहे. या बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देय रक्कम आदा करण्याची काम सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे संपर्क साधावा. तसेच कागदपत्रांची पूर्तता करुन रक्कम वेळेत मिळवून घ्यावी.
....

एक महिन्याच्या आत ...

भू-विकास बँक बंद केली जाणार आहे. बँकेच्या शेतकरी सभासदांनी सातबारावरील बोजाबाबत व कर्ज प्रकरणातील कागदपत्रांबाबत किंवा न्यायालयातील दाव्याबाबत कोणतीही माहिती किंवा कागदपत्र आवश्यक असल्यास हे निवेदन प्रसिध्द झाल्यापासून एक महिन्याच्या आत बँकेच्या कार्यालयात समक्ष येवून घेवून जाण्याचे आवाहनही श्री. करे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com