मल्हार सेना पत्रपरिषद

मल्हार सेना पत्रपरिषद

मल्हार सेनेतर्फे रविवारी मिरवणूक
कोल्हापूर, ता. २९ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना व युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (मंगळवारी) सर्व शासकीय कार्यालयात अहिल्यादेवींच्या प्रतिमा लावल्या जाणार असून, बुधवारी (ता.३१) सकाळी नऊ वाजता वाशी नाका येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकामध्ये जयंती सोहळा होणार आहे. रविवारी (ता.४) सायंकाळी पाच वाजता मिरजकर तिकटी येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अहिल्यादेवी होळकर यांची जयंती हा लोकोत्सव व्हावा, यासाठी विविध कार्यक्रम होतील. भव्य मिरवणूकीत धनगरी ढोल व कैताळाचे दोनशे लोकांचे पथक, गजनृत्य, महिला लेझीम पथक, मर्दानी खेळ, हलगी, सनई पथकांसह अहिल्यादेवींच्या जीवनावरील डिजिटल फलक असणारे सहा चित्ररथांचा समावेश असेल. अहिल्यादेवींच्या वेशभूषा केलेल्या तरुणी घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभाग घेतील. महिला व पुरुष पिवळे फेटे, पिवळे झेंडे घेऊन मिरवणुकीमध्ये संचलन करतील, असेही रानगे यांनी सांगितले.
बयाजी शेळके, राघू हजारे, छगन नांगरे, बाबूराव बोडके, दत्ता बोडके, शामराव माने, आनंदा धनगर, हेमंत बोडके, बबलू फाले आदी उपस्थित होते. दरम्यान, अकरा जूनला अकरा महिलांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिले जाणार आहेत.

चौकट
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तत्काळ पुर्ववत बसवा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही रानगे यांनी दिला. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना याबाबतचे निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com