मोफत सामुदायिक विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत सामुदायिक विवाह सोहळा
मोफत सामुदायिक विवाह सोहळा

मोफत सामुदायिक विवाह सोहळा

sakal_logo
By

मोफत सामुदायिक
विवाह सोहळा
पाच जूनला

कोल्हापूर ः येथील आधार फाऊंडेशन व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने पाच जूनला मोफत सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात दुपारी साडेबाराला हा सोहळा होणार आहे. याबाबतचीमाहिती संस्थेचे अध्यक्ष संजय गुदगे व उपाध्यक्ष आकाश पट्टण, सचिव प्रशांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह करणाऱ्या वधू- वरांना वीस हजार आणि संस्थेतर्फेही सहकार्य केले जाणार असून, राज्यातील जास्तीत जास्त वधू-वरांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी लक्ष्मण सावरे, संभाजी कागलकर, महेश शिंगे, सागर गोंधळे, अमित शिंगे, अक्षय तुदीगाल, बाबासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.