वारकरी संप्रदायासाठी जागा देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकरी संप्रदायासाठी जागा देण्याची मागणी
वारकरी संप्रदायासाठी जागा देण्याची मागणी

वारकरी संप्रदायासाठी जागा देण्याची मागणी

sakal_logo
By

05801
कोल्हापूर : डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देताना वारकरी मंडळाचे पदाधिकारी.

‘वारकरी भवनासाठी जागा द्यावी’
कोल्हापूर : महापालिकेच्या हद्दीतील अतिरिक्त क्षेत्रातील जागा वारकरी भवनासाठी द्यावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले. निवेदनातील माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने कोल्हापूर हे जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण असून, वारकरी संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांना निवारा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वारकरी भवनाची आवश्‍यकता आहे. जेणेकरून दैनंदिनी अडचणी सोडविता येतील. यासाठी महापालिका हद्दीतील अतिरिक्त क्षेत्रातील जागा वारकरी भवनासाठी द्यावी. अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले, राज्य कमिटी सदस्य यशवंत पाटील, जिल्हाध्यक्ष शिवाजी वागवेकर, उपजिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, काकासो हंडे, सुभाष जाधव, मारुती पाटील, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.