आय लिग फुटबॉल

आय लिग फुटबॉल

शिलाँग लाजाँगसह
दिल्ली एफसीला बढती
गडहिंग्लज, ता. ३० : अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) द्वितीय श्रेणी स्पर्धेची अंतिम फेरी पूर्ण झाली. यात दिल्ली एफसी आणि शिलॉंग लाजाँगने अनुक्रमे विजेते आणि उपविजेतेपद पटकाविले. त्यामुळे या दोन्ही संघांना पुढील हंगामात होणाऱ्या प्रथम श्रेणी आय लिगसाठी बढती मिळाली. अंतिम फेरीत पाच संघांचा सहभाग होता. निर्णायक सामन्यात दिल्ली एफसीने मुंबईच्या अंटालान्टा युनायटेडला ३-१ असे नमवून आपले स्थान निश्चित केले. गेल्या आठवड्यात शिलाँग लाजाँगने एफसी बंगलुरू युनायटेडला २-१ असे नमवून आय लिगमधील आपले तिकीट बुक केले होते. एफसी बंगलुरू युनायटेड आणि अंटालान्टा युनायटेडला प्रत्येकी सहा गुणासह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोलकत्त्याच्या युनायटेड एफसी पाचव्या स्थानावर राहिला. दिल्ली एफसी हा प्रथमच आयलिगसाठी पात्र ठरला आहे. तर शिलाँग लाजाँग चार वर्षांनंतर पुन्हा प्रथम श्रेणीत खेळेल.
महाराष्ट्र बाहेर
आय लिग प्रथम श्रेणीमधून महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले. यंदा प्रथम श्रेणीत सुमार कामगिरीमुळे मुंबईचा केंकरे एफसी गुणतक्त्यात तळाला राहिल्याने संघाची द्वितीय श्रेणीत गच्छंती झाली आहे. अंतिम फेरीत आशा असणारा अंबरनाथ युनायटेड निर्णायक सामन्यात पराभूत झाल्याने महाराष्ट्र प्रथम श्रेणीतून आउट झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com