महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घ्या
महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घ्या

महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घ्या

sakal_logo
By

ajr303.jpg...
05845
दाभिल (ता. आजरा) ः येथील कार्यक्रमात महावितरण आजरा उपविभागच्या सहाय्यक अभियंता नेहा पाटील -पोवार यांनी मार्गदर्शन केले. सरपंच युवराज पाटील व मान्यवर उपस्‍थित होते.
-----------------
महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घ्या
नेहा पाटील- पोवार; दाभिलमध्ये अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३० ः महावितरण ही कंपनी जनतेच्या सेवेसाठी आहे. महावितरणतर्फे विविध सेवा सुविधा व योजना शासनाने जाहीर केल्या आहेत. महीलांनी उद्योग व व्यवसायासाठी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक अभियंता नेहा पाटील- पोवार यांनी केले.
महावितरण आजरा उपविभागीय कार्यालयातर्फे मौजे दाभिल (ता. आजरा) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन केले होते. येथील अंगणाडीमध्ये झालेल्या शिबिरामध्ये चाळीस महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी नेहा पाटील -पोवार यांन मार्गदर्शन केले. सरपंच युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते.
वरिष्ठ तंत्रज्ञ निता गायकवाड, विद्युत सहाय्यक शुभांगी पैठणकर, सहाय्यक अभियंता अभिजीत दिवटे, निम्मस्तरीय लिपिक श्रावण कांबळे, वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष पुजारी यांनी ग्रामपंचायत सदस्या व इतर उपस्थित महिलांसोबत संवाद साधला. उपस्थितांना नवीन वीज कनेक्शन, वीज बिलाची माहिती, बिलिंग तक्रार निरसन, नावात बदल याबाबत माहीती दिली. तसेच दैनंदिन वीज वापरताना घरगुती विद्युत उपकरणे सुरक्षितरित्या कशी हाताळावीत, विजेची बचत, वीज अपघात होण्याची कारणे व घ्यावयाची दक्षता, वीर चोरीचे प्रकार व होणारा दंड याचीही माहिती दिली.
येथील शिवकन्या महिला बचत गटास नवीन औद्योगिक वीज जोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. यावेळी गरजू महिलांना पंधरा एल.ई.डी बल्ब वाटण्यात आले. स्वाती मस्कर, अंगणवाडी सेविका माया देसाई, अंजना भालेकर, सविता परब  तसेच सर्व  बचत गट महिला व गावातील महिला उपस्थित होत्या. उपसरपंच सुधा कांबळे, ग्रामपंचायात सदस्य रवींद्र मुगुर्डेकर, पूनम गायकवाड, माधुरी सुतार, बचत गट प्रमुख नम्रता नार्वेकर यांचे सहकार्य लाभले.