विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

gad303.jpg
05846
गडहिंग्लज : शहरातील विविध विकास कामांचा प्रारंभ समरजित घाटगे यांच्याहस्ते झाला. यावेळी राजेंद्र तारळे, प्रितम कापसे, अनिल खोत, वामन बिलावर आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------
विकासाचा बॅकलॉग भरून काढणार
समरजीत घाटगे : गडहिंग्लजला एक कोटी एक लाखाच्या कामांचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : आतापर्यंत गडहिंग्लज तालुक्यातील जनतेचा वापर विद्यमान आमदारांनी केवळ मतदानासाठीच केला. त्यांच्या सत्ता काळात आरोग्य सेवेतील सुविधा अपडेट करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र येत्या काळात गडहिंग्लजच्या जनतेला हक्काच्या रखडलेल्या सर्वच मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून गडहिंग्लजचा रखडवलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढणार, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
शहरातील १ कोटी १ लाखाच्या विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. साई मंदिर रोडला एका बाजूस काँक्रिट गटर, हाळलक्ष्मी नगरातील मुल्ला ते शिंदे घर, चव्हाण ते रवी पाटील घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, लाखेनगर रस्ता, अर्बन कॉलनीतील रस्ता डांबरीकरण कामांचा प्रारंभ घाटगे यांच्याहस्ते झाला.
श्री. घाटगे म्हणाले, ‘जनतेच्या शाश्वत विकासाआड येऊन श्रेयवादासाठी हपापलेल्यांना आगामी निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करा. उपजिल्हा रुग्णालय दोनशे बेडचा करण्याचा प्रस्ताव तत्काळ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. याबाबत तत्काळ पाठपुरावा करु.’
तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, प्रा. अनिता चौगुले, दीपक पाटील, चंद्रकांत सावंत, विठ्ठल भमानगोळ, शैलेंद्र कावणेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com