लाकूडवाडीच्या विकासासाठी कटिबध्द

लाकूडवाडीच्या विकासासाठी कटिबध्द

ajr305.JPG...
05928
लाकूडवाडी (ता. आजरा) ः ‘गोकुळ’च्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांचा सत्कार केरूबाई कुराडे यांनी केला. या वेळी मान्यवर उपस्थित होते.
---------------------

लाकूडवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध
---
‘गोकुळ’ संचालिका अंजनाताई रेडेकर; ट्रान्स्फॉर्मरचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३० ः लाकूडवाडीने मला नेहमीच सहकार्य केले आहे. राजकीय पाठबळही दिले. या गावचा व माझा ऋणानुबंध कायम आहे. तो मी जपेन. गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन ‘गोकुळ’च्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले.
लाकूडवाडी (ता. आजरा) येथे नवीन ट्रान्स्फॉर्मरचे उद्‍घाटन श्रीमती रेडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्याने व श्रीमती रेडेकर यांच्या प्रयत्नातून मारुती गोविंद कुराडे यांच्या शेतात ट्रान्स्फॉर्मर बसविला आहे. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होईल.
श्रीमती रेडेकर म्हणाल्या, की वीज, पाणी व रस्ता या पायाभूत गरजा आहेत. त्या उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना मातीतून सोने पिकविता येईल. येथील विजेची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. या वेळी श्रीमती रेडेकर यांचा सत्कार केरूबाई कुराडे यांच्या हस्ते झाला. सरपंच जयश्री गिलबिले यांचा सत्कार शीतल कुराडे यांच्या हस्ते झाला. गिरिधर कुराडे, श्रीधर कुराडे, विष्णू कुराडे, रमेश गिलबिले, तानाजी आंबुलकर, चंद्रकांत गिलबिले आदी उपस्थित होते. कृष्णा माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शंकर कुराडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com