Sat, Sept 30, 2023

रस्ता पाहणी
रस्ता पाहणी
Published on : 30 May 2023, 3:58 am
05947
तावडे हॉटेलजवळील खचलेल्या रस्त्याची
आमदार सतेज पाटील यांनी केली पाहणी
कोल्हापूर, ता. ३० ः तावडे हॉटेल ते शिरोली जकात नाका दरम्यानचा रस्ता खचून भेगा पडल्या आहेत. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या रस्त्यावर अपघाताच्या शक्यतेने आमदार सतेज पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते.
हा रस्ता दिवसेंदिवस खचत चालला आहे. मध्यभागी भेगा पडत आहेत. रात्री अपघाताची शक्यता आहे. आमदार सतेज पाटील यांनी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या समवेत पाहणी केली. खचलेला रस्ता, मोठ्या भेगा, संरक्षणासाठी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दुभाजकाचे उखडलेले खांब हे पाहून आमदार पाटील यांनी शहर अभियंता घाटगे यांना रस्त्याची तातडीने डागडुजी करून भेगा मुजवण्याच्या सूचना केल्या.