निवृत्त पोलिस अधिकारी सत्कार

निवृत्त पोलिस अधिकारी सत्कार

05902
-----
निवृत्तीनंतरचे आयुष्य एकमेकांच्या
सहकार्याने आनंदाने जगाः भगवंतराव मोरे

सेवानिवृत्त पोलिसांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सत्कार

कोल्हापूर, ता. ३० ः ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद जपत आयुष्यभर काम केलेल्या पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदाने जगावे, एकमेकांना सहकार्य करावे’, असा असा सल्ला निवृत्त अपर पोलिस महासंचालक आणि राज्य मानव आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे यांनी दिला.
सेवानिवृत्तांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून छत्रपती शाहू निवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनच्यावतीने ११९ सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार आज करण्यात आला. पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये हा सत्कार झाला. यावेळी निवृत्त पोलिसांच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करणे, त्यांच्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सहली, मार्गदर्शनपर, तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या छत्रपती शाहू निवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनच्यावतीने पार पाडल्या जातात. यातीलच एक भाग म्हणून असोसिएशनच्यावतीने पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या आणि वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या ११९ जणांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ मांढरे यांनी सांगितले.
‘सेवानिवृत्तीनंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्वीसारखा सन्मान लाभत नाही. मात्र असोसिएशनने सेवानिवृत्तांचा केलेला सन्मान त्यांना बळ देणारा आहे. या व्यक्तींना निरोगी आयुष्यासाठी संघटनेने तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करावे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेने शासनदरबारी प्रयत्न करावेत’, असे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगितले. नुतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे सेवानिवृत्तांना अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत. या संस्थेचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त केले.
राज्य मानव आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, रामराव पवार, जयश्री देसाई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाले. यावेळी सत्कारमुर्ती आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी बाळासाहेब गवाणे, पी. ए. पाटील, भारतकुमार राणे, शिवाजी कणसे, फुलचंद चव्हाण, प्यारे जमादार, केशव डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com