श्री शिवाजी मंडळ उपांत्य फेरीत

श्री शिवाजी मंडळ उपांत्य फेरीत

05922
--
लोगो- अटल चषक फुटबॉल स्पर्धा
-

शिवाजी तरूण मंडळ उपांत्य फेरीत
फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघावर विजय

कोल्हापूर, ता. ३० : श्री शिवाजी तरुण मंडळ संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघावर २ विरुद्ध १ गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अटल चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम वर सुरू आहे.
फुलेवाडी संघाने नियोजनबद्ध खेळाने सुरुवात करत चांगली सुरुवात केली. लॉन्ग पास व शॉर्ट पासिंगवर भर देत श्री शिवाजी मंडळची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोल नोंदवण्यात यश आले नाही. शिवाजी तरुण मंडळ संघाकडून आक्रमक चाली रचताना फुलेवाडी संघाच्या बचावफळी व मध्य फळीचा संपूर्ण अंदाज घेऊनच पुढे चाल केली. यात फुलेवाडीच्या संदीप पोवारने शिवाजी तरुण मंडळ संघाच्या करण चव्हाण-बंद्रे याला धोकादायकरित्या अडवल्याबद्दल शिवाजी तरुण मंडळ संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला विशाल पाटील याने यावर गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. तर थोड्याच वेळात ३० व्या मिनिटाला योगेश कदम याने मारलेला जोरदार फटका गोलजाळीत विसावला. यासह शिवाजी तरुण मंडळ संघाने २ - ० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात फुलेवाडी संघाकडून अधिक आक्रमक चढाया झाल्या. मात्र, यश आले नाही. शिवाजी तरुण मंडळ संघानेही गोलफरक वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते फोल ठरले. सामन्यांच्या ८० व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळ संघाच्या ऋतुराज सूर्यवंशी गोलजाळी क्षेत्रात असताना चेंडू हाताने हाताळल्याने फुलेवाडी संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. यावर रोहित मंडलिक याने गोल नोंदवत सामना २ - १ असा केला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिली.

चौकट
उत्कृष्ट असे
सामनावीर ः योगेश कदम : श्री शिवाजी तरुण मंडळ
लढवय्या ःअक्षय शिंदे : फुलेवाडी क्रीडा मंडळ

चौकट
आजचा सामना
संयुक्त जुना बुधवार विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ - ब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com