जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

जातीच्या दाखल्याअभावी प्रलंबित
प्रकरणे मार्गी लावा ःजिल्हाधिकारी

कोल्हापूर, ता.३० : जातीच्या दाखल्याअभावी प्रलंबित असणारी अनुसूचित जाती- जमातीमधील प्रलंबित प्रकरणे पिडितांच्या घरी जावून त्यांच्याकडून आवश्‍यक कागदपत्रे मिळवून मार्गी लावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीकडे आलेल्या तक्रारींचे आवश्यक कागदपत्रे त्या त्या विभागांकडून मिळवून घेतली पाहिजे. तसेच अशी प्रकरणांचा निपटारा तात्काळ केला पाहिजे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत पोलीस तपासातील प्रलंबित प्रकरणात कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य देण्यास वेळ होत आहे. तर, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीला प्रतिबंध केला पाहिजे. तसेच असे कामगार असतील तर त्यांचे पुनवर्सनही केले पाहिजे. शासकीय व निम शासकीय कार्यालयातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांची संख्या, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील सफाई कामगारांना काम करताना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, उपकरणांचाही रेखावार यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com