पावसाची हुलकावणी

पावसाची हुलकावणी

जिल्ह्यात वळीव पावसाची हुलकावणी

कोल्हापूर, ता. ३० : जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. दुपारी उष्मा वाढला आणि जोरदार वाराही सुटला. मात्र, ढगांनी भरलेले आकाश बघता बघता निरभ्र झाले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या वळीव पावसाने कोल्हापूर शहर आणि परिसरात पुन्हा हुलकावणी दिली.
जिल्ह्यात जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होईल, ठिकठिकाणी विजा पडण्याचा धोकाही हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दुपारी पावणे चारच्या सुमारास शहरासह परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यातच आकाशात काळे ढगही दिसत होते. त्यामुळे जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांसह शहरवासियांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. सोसाट्याचा वारा सुटल्याने करवीर, हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी विज पुररवठा खंडित केला होता. करवीर तालुक्याच्या पश्‍चिम भागातून येत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शहरावर दाटलेले ढग हळूहळू पूर्वेकडे म्हणजेच हातकणंगले, शिरोळ तालुक्याकडे सरकले. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. वळीव पावसाअभावी भात, भुईमूग, सोयाबीनसह खरीपातील पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी मशागतीची कामे अजूनही सुरु आहेत. वळीव पाऊस झाल्यानंतर पेरण्यांना गती येणार आहे.
...

दोन दिवसात वळीव पडण्याची शक्यता

जिल्ह्यात ७ ते १० जून दरम्यान मॉन्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. तर, आज हुलकावणी दिलेला वळीव पाऊस येत्या दोन दिवसात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com