मनसे निवेदन बातमी

मनसे निवेदन बातमी

खुपिरे रस्त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

मनसेची मागणीः जिल्हा परिषद प्रशासकांना निवेदन

कोल्हापूर, ता. ३० ः खुपिरे (ता.करवीर) येथील रस्त्याचे डांबरीकरण ८० मीटर झाले आहे. मात्र १३० मीटरचे बिल देण्यात आले आहे. याची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, खुपिरे गावातील एका रस्त्याच्या डांबरीकरण आणि खडीकरण करण्याचे काम एका ठेकेदाराला निविदा भरून देण्यात आले होते. ठेकेदाराने ८० मीटर रस्त्याचे काम केले. पण त्याला १३० मीटर रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणाचे बिल देण्यात आले. याबाबत वेळोवेळी जे अहवाल बनवण्यात आले, त्यामध्येही ही बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या निधीचा दुरूपयोग करणे, रस्ते ठेकेदाराशी हातमिळवणी करून चुकीची मापे शासनाला कळविणे, न केलेल्या रस्त्यांचे बिल ठेकेदाराला मिळवून देणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवून संगमनताने शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com