इचल : वस्त्रोद्योग धोरण विशेष

इचल : वस्त्रोद्योग धोरण विशेष

नविन वस्त्रद्योग धोरणाने सार्वत्रिक संभ्रम

सवलत अथवा लाभाबाबत स्पष्टता नाहीः वीज सवलतीचे धोरण पुढे सुरु राहणार काय?

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा

इचलकंरजी, ता.३० ः महाराष्ट्र शासनाने आज पुढील पाच वर्षांसाठी जाहीर केलेल्या वस्त्रद्योग धोरणाने सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. साध्या यंत्रमागासह अत्याधुनिक यंत्रमागासाठी या धोरणांत सवलत अथवा लाभाबाबत तूर्तास स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे वस्त्रोद्योगातील अस्वस्थता वाढीस लागली आहे. विशेष करुन वीज सवलतीचे धोरण पुढे सुरु राहणार काय, याबाबत यंत्रमागधारकांसह विविध घटकांमध्ये प्रचंड धाकधूक आहे. या नव्या धोरणाबाबत पुढील दोन - तीन दिवसांत शासन आदेश निघणार आहे. त्यानंतर कोणत्या घटकांना काय मिळणार व इचलकरंजीला कितपत लाभ होणार हे समोर येणार आहे.
यापूर्वीच्या वस्त्रोद्योग धोरणाची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर होईपर्यंत जुन्या वस्त्रोद्योगाला मुदतवाढ दिली होती. सध्या यंत्रमाग उद्योगासह वस्त्रोद्योगातील विविध घटक अडचणीतून जात आहेत. मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे नविन वस्त्रोद्योग धोरणांकडे विशेष लक्ष लागले होते. त्यानुसार आज राज्य शासनाने नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. मात्र या धोरणांतील तरतुदी स्पष्ट झालेल्या नाहीत. यातून संभ्रम निर्माण होत आहे. आपापल्या पातळीवर या धोरणाचा अर्थ काढला जात आहे. या धोरणांतून इचलकरंजीला काय मिळणार हे स्पष्ट होत नाही. राज्यातील सहा टेक्स्टा्ईल पार्कचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये इचलकरंजीतील कोणत्या टेक्स्टाईल पार्कला लाभ मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इचलकरंजीसह मालेगाव, भिवंडीमध्ये साधे यंत्रमाग जास्त आहेत. या यंत्रमागाच्या संरक्षणासाठी काय, याचे उत्तर सध्या तरी अनुत्तरीतच आहे. वस्त्रोद्योगातील महत्वाचा घटक असलेल्या सूतगिरण्यांसह सायझिंग उद्योगांना गेल्या धोरणांत वीज सवलत कायम राहणार काय, हे स्पष्ट होत नाही. कारण नविन धोरणात ग्रीन एनर्जीवर दिलेला भर संभ्रमात टाकणारा आहे. पण पूर्वीच्या वीज सवलती कायम राहतील, अशी आशा आहे. ६० वर्षांवरील विणकरांना निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येणार आहे. तथापि, ही योजना विणकर की कामगार यांना लागू असणार हे नंतर स्पष्ट होणार आहे. एकूणच या वस्त्रोद्योग धोरणांतून खुशी निर्माण होण्यापेक्षा अवस्थता वाढीस लागल्याचे चित्र आहे.
----

वस्त्रोद्योग तज्ज्ञांमध्ये मतभेद

नविन वस्त्रोद्योग धोरणांतील लाभांबाबत वस्त्रोद्योग तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही विशिष्ट घटकांनाच लाभ मिळण्याच्या उद्देश या धोरणांत दिसत असल्याचे मत कांही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर सर्वच घटकांना या धोरणांत लाभ मिळणार असल्याचा दावा काही जाणकारांनी केला आहे. इचलकरंजीसाठी हे धोरण अनुकूल असेल, असाही दावा करण्यात येत आहे. एकूणच पुढील एक - दोन दिवसांत याचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर दावे - प्रतिदाव्यांची सत्यता समोर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com