
एकात्मिक संचांचे झाले वितरण
gad311.jpg
06079
गडहिंग्लज : एम. आर. हायस्कूलवर शिक्षण विभागातर्फे एकात्मिक संचांचे वितरण करण्यात आले. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------
एकात्मिक संचांचे झाले वितरण
गडहिंग्लजला १९६९२ विद्यार्थी; शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : मोफत शालेय पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत एकात्मिक संच तालुकास्तरावर आले होते. आज त्यांचे वितरण केंद्रस्तरावर केले. येत्या दोन दिवसात केंद्रस्तरावरुन शाळा स्तरावर त्यांचे वितरण करण्यात येईल. गडहिंग्लज तालुक्यातील १९ हजार ६९२ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या हातात एकात्मिक संच मिळणार आहेत.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत शालेय पाठ्यपुस्तक योजना राबवली जाते. जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी विनाअनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. गडहिंग्लज तालुक्यात १९ हजार ६९२ विद्यार्थी पात्र आहेत. २०२१ च्या युडायस आणि ३० सप्टेंबर २०२२ च्या पटानुसार ही संख्या निश्चित केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार यंदा एकात्मिक संच देण्यात आले आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी चार भाग करण्यात आले आहेत.
एकात्मिक संच तालुकास्तरावर आले होते. आज त्यांचे केंद्रस्तरावर वितरण करण्यात आले. शिक्षण विभागातर्फे येथील एम. आर. हायस्कूलवर एकात्मिक संचांच्या वितरणाची व्यवस्था केली होती. प्रत्येक केंद्रनिहाय वितरण करण्यात आले. येत्या दोन दिवसात केंद्रावरुन शाळा स्तरावर एकात्मिक संचांचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी एकात्मिक संच हातात मिळणार आहेत.
------------
तिसरी, चौथी, आठवीचे संच कमी
एकात्मिक संचांचे केंद्रस्तरावर वितरण झाले असले तरी काही इयत्तांचे संच कमी आलेले आहेत. मराठी माध्यमाच्या तिसरीचे भाग तीन व भाग चारचे संच प्राप्त झालेले नाहीत. तसेच उर्दू माध्यमाच्या तिसरीचे भाग एक, तीन व चार, सहावीचा भाग एक व दोन, आठवीचा भाग एक व चार अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच ३० सप्टेंबर २०२२ च्या पटानुसार विद्यार्थी संख्या निश्चित केल्यामुळे संच कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अधिकच्या संचांची मागणी नोंदवलेली आहे.