शरद इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची निवड

शरद इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची निवड

शरद इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची निवड
दानोळी, ता. १ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील दहा विद्यार्थ्यांची अदानी ग्रुप लिमिटेड या कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रीकलच्या अभिजित पट्टेकरी, कल्याणी गोडसे, महमदनौमन शेख, मोइन मुजावर, निखिल शंभुशेट्टे, निकीता पवार, पल्लवी मांगावकर, रुचीती पडळकर, ऋतुजा एकटे, तुषार पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
कंपनीकडून विद्यार्थ्यांची ऑनलाईन असेसमेंट झाली. त्यानंतर एच.आर. पॅनेलकडून महाविद्यालयात टेक्निकल इंटरव्ह्यु, एचआर इंटरव्ह्यु घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड केली. अदानी ग्रुप लि. हि देशातील अग्रेसर कंपनी आहे. कंपनी अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी विलमार अशा अनेक क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. कॅम्पससाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांकडून मॉक इंटरव्ह्यु घेतले. तसेच कंपनीनुसार टेस्ट सिरिज सोडवून घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे आदींचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com