
बसर्गेत उन्हाळी व्यक्तीमत्व विकास शिबीर उत्साहात
gad314.jpg
06151
बसर्गे : व्यक्तीमत्व विकास शिबीरात केदार नाडगोंडे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मुख्याध्यापक, प्रशिक्षक व शिक्षक उपस्थित होते.
------------------------------------------------
बसर्गेत उन्हाळी व्यक्तीमत्व
विकास शिबीर उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
दुगूनवाडी, ता. ३१ : बसर्गे (ता.गडहिंग्लज) येथील एस. एम. हायस्कूल आणि नंदनवाडच्या शिवराय हायस्कूलतर्फे पाच दिवसीय उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर झाले. शिबीरात किशोर बागिलगेकर यांनी कराटेविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
बाळू शिंदे व कलाप्पा जोडगुद्री यांनी विद्यार्थ्यांना योगांचे प्रशिक्षण दिले. सागर नाशिपुडे यांनी कला व क्राफ्ट वर्कविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. पवईचे अनिकेत खेडकर व विनीत गुरव यांनी मी व माझे व्यक्तिमत्व, सागर मांजरे यांनी आपले आरोग्य व व्यायाम, तेजस्विनी जोशी यांनी गो-शाळा व सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन केले. एस. बी. पाटील, संस्थेचे सचिव आर. बी. टेळे यांनी श्रीमंत नाडगोंडे सरकाराच्या कार्याविषयी माहिती दिली. संस्थेचे संचालक श्रीमंत केदार नाडगोंडे सरकार यांनी स्वतःला घडवा व स्वतःचे व्यक्तिमत्व तयार करा असा सल्ला दिला. हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेजच्या बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी अश्विनी कदम, प्रतिभा भुईंबर, आरती कोळी, बाळेश मणिकेरी या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. सर्व सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. संचालक आण्णापा मणिकेरी, दुडांप्पा कटकोळी, सरपंच भारती रायमाने, पोलिस पाटील भागोजी कागिनकर, महेशकुमार नाईक, सुभाष थोरात आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन आर. डी. कुंभार यांनी केले. शितल करडे यांनी आभार मानले.