पंचगंगा पूल वर्धापनदिन

पंचगंगा पूल वर्धापनदिन

06175
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज विस्तारीत पुलाच्या चौथा वर्धापन दिनी रविकिरण इंगवले, भालचंद्र अष्टेकर, अरुण खोडवे, वसंत लिंगनूरकर, महेश चोपडे आदी.

छत्रपती शिवाजी महाराज पुलाचा
‘जीवदान’कडून वर्धापन दिन
कोल्हापूर, ता. ३१ : जीवदान सेवाभावी संस्थेतर्फे पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज विस्तारीत पुलाचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पुलास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर अध्यक्ष रवीकिरण इंगवले, महालक्ष्मी बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र अष्टेकर आदींच्या हस्ते वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी आतषबाजी करण्यात आली. इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. या दरम्यान, तामिळनाडू येथे आयोजित नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत १० किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सुनीत कुडाळकर यांचा गौरव करण्यात आला. ‘जीवदान’चे अध्यक्ष अरुण खोडवे यांनीही मनोगत व्यक्त केले. वसंत लिंगनूरकर यांनी प्रास्ताविक केले. महेश चोपडे यांनी प्रार्थना केली. उपाध्यक्ष भगवान खबरे, अक्षय बागडी, अविनाश गायकवाड, अमित खोड, सूरज चित्रक, अमोल साळोखे, संजय भोसले, सुनील खोडवे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com