
कागल तालुका क्रिकेट असोसिएशन चा विजय
कागल तालुका क्रिकेट असोसिएशनचा विजय
कोल्हापूर, ता. ३१ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित व यादव बंधू (शिरोळ) पुरस्कृत माजी आमदार स्व. दिनकरराव यादव चषक ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धेतील आजचा सामना कागल तालुका क्रिकेट असोसिएशन विरुद्ध क्लॅक्स सोल्युशन मयुर स्पोर्टस् यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्यात कागल तालुका क्रिकेट असोसिएशनने ४ विकेटनी विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करताना मयुर स्पोर्ट्सने ३५ षटकांत ९ बाद १७४ धावा केल्या. यामध्ये वैभव पाटील २४, यश सनगर नाबाद २३, स्वप्नील जगताप नाबाद २१ धावा केल्या. कागलकडून रणजीत निकमने ३, विवेक पाटील व शुभम नाईक यांनी प्रत्येकी २, विश्जित कोळी व साद मुजावर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना कागल तालुका क्रिकेट असोसिएशनने ३२.५ षटकांत ६ बाद १७५ धावा केल्या. यामध्ये रणजित निकम नाबाद ७४, ऋषीकेश चौगुले ३४, विश्वजित कोळी १७ धावा केल्या. मयुर स्पोर्टस् कडून विकास पुजारी व प्रसाद पाटील यांनी प्रत्येकी २, नझीर शेख व संग्राम पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.