जागतिक दुग्धदिन

जागतिक दुग्धदिन

लोगो - जागतिक दुग्धदिन

तरुणांनी दूधाचे महत्व
जाणून घ्यावे : अरुण डोंगळे
कोल्हापूर, ता. ३१ : जगात २००१ सालापासून युनोच्या अन्न व शेती संस्थांतर्फे जागतिक दुग्धदिन साजरा केला जातो. यादिवशी जगातील दुधाचे उत्पादन व दुग्धव्यवसायाची माहिती जगभर प्रसारित केली जाते. दिवसेंदिवस या दिवसाची व्याप्ती आणि महत्व वाढत आहे. त्यावरूनच दूध हा विषय सर्वांच्या आवडीचा असल्याचे दिसून येते. १ जून हा दिवस जागतिक दुग्धदिन म्हणून साजरा करतो. २०१५ मध्ये सुमारे ४० देशांनी जागतिक दुग्धदिन साजरा केला. या वेळी खेड्यातील दुग्ध व्यवसाय कसा चालतो हे शहरातील ग्राहकांना समजावा यासाठी सहली आयोजित केले होते. शाळांमध्ये सेमिनार, कॉन्फरन्स घेण्यात चढाओढ दिसून आली. एकूणच जगाला दूधाचे महत्व पटले आहे. आता तरुणांनी दूधाचे महत्व पटवून घेवून त्याचा वापर केला पाहिजे, असे मत जागतिक दुग्धदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘दूध हे पुर्णान्न म्हणून स्वीकारले आहे. दूधाकडे जागतिक पातळीवरचे सर्वंकष अन्न म्हणूनही पाहतात. सशक्त खाद्यान्न म्हणून दुधाकडे पाहावे व त्याप्रमाणे आपली उत्पादने तयार करण्यासाठी यावर केंद्रीकरण करावे हाही हा दिन साजरा करण्याचा उद्देश आहे. आपल्याकडे गाईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूजाविधीमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर पवित्र मानला जातो. पूर्वी गोदान हे महादान समजले जायचे. आजकाल नवीन पिढीला मात्र दुधाचे महत्व समजावून सांगण्याची वेळ आली आहे. लहान मुलांना दूध आवश्‍यक आहे. शरीरातील हाडांचा ऱ्हास होत नाही. डोकेदुखी, मुलांमधील लठ्ठपणा आणि अनावश्यक ताण कमी करण्यामध्ये कॅल्शिअम कामी येते. काही देशात दूधामध्ये वरून व्हिटॅमिन-डी घालण्याची पध्दत आहे. भारतात सध्या माणसी दूध उपलब्धता ३४५ ग्रॅम असून २०५० पर्यंत ही उपलब्धता ८०० ग्रॅम इतकी होणार आहे.
सध्या शरिराला हानीकारक शीतपेय पिण्याची सवय लागल्यामुळे भारतीय नागरिकांचे शरीराची हानी होत आहे. १५ वर्षांपूर्वी चीनमध्ये दूध पिण्याची संस्कृती नव्हती. त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्या नागरिकांना दूधाची उपलब्धता करून दिल्यास त्यांची शारीरिक वाढ झपाट्याने होईल व त्यावर त्यांनी शाळेत सक्तीने दूध वाटपाची व्यवस्था केली आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. आजच्या जागतिक दुग्धदिनानिमित्त उत्तम आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी उत्तम गुणवत्तेचे दूध प्रेत्येकाने प्यावे व शतायुष व्हावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com