
ऋतुराज पाटील निवेदन
06224
कोल्हापूर ः सिल्वर लेक कॉलनीतील विकासकामांचे निवेदन आमदार ऋतुराज पाटील यांना देताना ॲड. अभिजीत सारंग, केदार कुलकर्णी, किरण व्हनगुत्ते आदी.
सिल्वर लेकमधील रस्ते,
बाग विकासची मागणी
कोल्हापूर, ता ३१ ः हरिओम नगर येथील सिल्वर लेक कॉलनीतील अंतर्गत रस्ते दुरूस्त तसेच बागेच्या विकासासाठीचे निवेदन कॉलनीतील नागरिकांना आमदार ऋतुराज पाटील यांना दिले.
मुख्य रस्त्याचे उद्घाटन आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी सिल्वर लेक कॉलनीतील अंतर्गत रस्ते दुरुस्ती तसेच खुली जागा विकसित करण्याच्या मागणी निवेदनाद्वारे केल्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यासोबत रस्ते आणि बागेची पाहणी केली. पुढील कारवाईचे संबंधितांना आदेश दिले. बागेची स्वच्छता व वॉकिंग ट्रॅकचे तातडीने काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. कॉलनीचे अध्यक्ष ॲड. अभिजीत सारंग, केदार कुलकर्णी, किरण व्हनगुत्ते, रणधीर चव्हाण, विनय जोशी, अमित मुदगल, सर्जेराव शिंदे, सागर खोत, सचिन पोवार, सुमेध सोळंकुर, संपत पाटील, विशाल भस्मे आदी उपस्थित होते.